पण या घाटात आता चिपळूण , खेड जवळून लोक येतात ते निसर्गसौंदर्य पाहायला. पावसाळ्यात घाटात सगळीकडे धबधबे, आणि धुकं असतं. घाट तसा कठीण वळणांचा आहे .
शिवाय पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा संभव.
खेड तालुक्यातील खोपी गावाजवळ हा घाट आहे. NH66 वर खेड रेल्वे स्टेशन नजीक खोपी फाटा आहे. तिथून पुढे साधारणपणे 18-20 किमी खोपी आणि तिथून पुढे "रघुवीर घाट" चालू......
सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झालेला असला तरी घाटावर वातावरण थंड होतं, मध्येच एक-दोन सारी येऊन परिसर मोहक करून गेल्या.
चारही बाजूनी सह्याद्रीच्या रांगा, पावसामुळे सगळीकडे हिरवळ, त्यातच मध्ये मध्ये धुकं, पावसाची रिपरिप चालू. या सागळ्यातच दूरवरच्या डोंगरावर पडलेलं ऊन. नक्कीच एक रम्य संध्याकाळ!!...
घटमाथ्यावरून दिसणारं दृश्य एकदम विलोभनीय आहे. एकीकडे शिरगाव धरण, दुसरीकडे खोल दरी आणि त्यात खळाळणारे पाणी..अप्रतिम !!
या घाटातून पुढे 'महिमानगड' आहे, तसेच चकदेव येथे एक शंकर मंदिर आहे. घाटमाथ्यावर लावलेल्या फलकावर संपूर्ण नकाशा आणि जवळपासच्या परिसराची माहिती दिलेली आहे.
ज्या ठिकाणी सुंदर निसर्गसौंदर्य बघण्यासाठी गर्दी होते ,त्याच ठिकाणी "शिव सह्याद्री" नावाचे हॉटेल आहे. नाश्त्याची उत्तम सोय आणि निवांत बसण्यासाठी मस्त जागा...
तेथे टिपलेले काही फोटो ब्लॉग मध्ये समाविष्ट केले आहेत..
फारच सुंदर! आपलं कोंकण तसं निसर्गसंपत्तीच्या बाबतीत कुबेरालाही लाजवेल इतकं समृद्ध. तरी आपल्यालाही थक्क व्हायला होईल असं सौंदर्य भरलंय रघुवीर घाटात. कधी जायचा योग्य नाही आला, पण असं ऐकलंय की तिथेच जवळ एक प्राचीन शिवमंदिर आहे जिथे शिड्या चढून जावं लागतं. तेच चकदेव मंदिर का?
उत्तर द्याहटवाघाटमाथ्यावरून पुढे गेलो नाही, पण त्या फलकावर लिहिल्याप्रमाणे जे "चौकेश्वर" देवालय आहे, ते असू शकतं.. माहिती समजल्यास कळवतो
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा